म्हसवड : महाराष्ट्र राज्य सरकारने ७५ लाख महावितरणच्या ग्राहकांची वीज तोडण्याचा निर्णय घेवून सामान्य जनतेवर जो आसूड उगारला आहे त्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्य सरकारच्या अनास्थायी आणि हिन कृत्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर राज्यव्यापी “टाळा ठोको, हल्ला बोल आंदोलन” करण्यात येत असून त्याचाच भाग म्हणून भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी. मोर्चा (पश्चिम महाराष्ट्र विभाग) च्या वतीने सरकारच्या ह्या तुघलकी निर्णयाविरूद्ध जनतेसाठी सिंहगड रोड येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा नेवून तेथील पदाधिकाऱ्यांना निषेधार्थ निवेदन देण्यात आले.
तसेच नऱ्हेगाव येथे भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी. मोर्चा (पश्चिम महाराष्ट्र विभाग) ची कार्यकारणी बैठक पार पाडण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी. मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष करण पोरे, संपर्क प्रमुख वीणाताई सोनवलकर, सचिव अनूप सुर्यवंशी, सह. संपर्क प्रमुख युवक निखिल झगडे, सह. संपर्क प्रमुख (प.महाराष्ट्र) नंदकुमार यादव व ओ.बी.सी. मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष सागर सत्यवान भुमकर व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस