भंडारा : आज दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री भंडारा जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पहाणी करणार आहेत. यानंतर ते नवजात बालकं गमावलेल्या पालकांचे सांत्वन करुन त्यांना दिलासा देतील.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ( SNCU ) शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीमुळे 10 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्य सरकारने तातडीने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस
