मुंबई : संपूर्ण देशाला हादरावून सोडणाऱ्या 09 जानेवारी रोजी भंडारा जिल्हा रुग्णालयातील 10 नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी माहिती समोर आली आहे. चौकशी समितीने दिलेल्या अहवालात 2 परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे 10 चिमुरड्यांचा हकनाक बळी गेला असल्याचे नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
या प्रकरणी सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. शॉर्ट सर्किटमुळे रुग्णालयात आग लागली असल्याचे यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. ‘यावेळी ड्युटीवर तैनात असलेल्या 2 परिचारिकांच्या कामावर ठपका ठेवण्यात आला आहे. ज्या दिवशी नवजात बाळांच्या अतिदक्षता युनिटमध्ये आग लागली होती. तेव्हा तिथे कुणीही नव्हते. जर त्यावेळी युनिटमध्ये दोन्ही परिचारिका थांबल्या असत्या तर ही दुर्घटना घडलीच नसती, असं परखड मत समितीने नोंदवले असल्याचे समोर आले आहे.
तसंच, रुग्णालयामध्ये रात्रपाळीला असलेल्या वरिष्ठ डॉक्टरांवर सुद्धा बोट ठेवण्यात आले आहे. रात्रीपाळीला असताना एका डॉक्टरांनी या वार्डाकडे राऊंड मारला नाही.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
