• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

…कारण त्यांच्यासाठी जमिनीचा तुकडा हाच परमेश्वर : शिवसेना

tdadmin by tdadmin
January 14, 2021
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter


मुंबई : कृषी कायद्याबाबत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेनं मोदींना सल्ला दिला आहे. ‘कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांचे मन राखावे. मोदी आज आहेत त्याच्यापेक्षा मोठे होतील’, असं संजय राऊत सामनाच्या अग्रलेखातून म्हणाले आहेत. ‘वातावरण जास्त बिघडू नये, असं सरकारला वाटत असेल, तर त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. दुसऱ्यांचे खांदे भाड्याने घेऊन शेतकऱ्यांवर बंदुका चालवू नयेत. आतापर्यंत 60-65 शेतकऱ्यांनी आंदोलनात बलिदान दिलं आहे. एवढं कठोर आणि शिस्तबद्ध आंदोलन स्वातंत्र्यानंतर झालं नव्हतं’, असं सामना मध्ये लिहिण्यात आलं आहे.

 


‘सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांना तात्पुरती स्थगिती देत चार सदस्यांच्या समितीची नियुक्ती केली, पण हे चारही सदस्य कालपर्यंत कृषी कायद्याची वकिली करत होते, त्यामुळे शेतकरी संघटनांनी झिडकारलं आहे. शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. आंदोलनात खलिस्तानवाद्यांनी शिरकाव केल्याचं सरकारचं सर्वोच्च न्यायालयातलं वक्तव्य धक्कादायक आहे. आंदोलक सरकारचं ऐकत नाहीत, म्हणून त्यांना देशद्रोही, खलिस्तानवादी ठरवून काय साध्य करणार आहात? चिनी सैनिक भारताच्या हद्दीत घुसले, त्यांच्या माघारीची चर्चा सुरू आहे, पण शेतकरी आंदोलकांना खलिस्तानवादी ठरवून बदनाम केलं जात आहे. जर आंदोलनात खलिस्तानवादी घुसले असतील, तर हे सरकारचंच अपयश आहे’, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.


‘शेतकरी सर्वोच्च न्यायालयरूपी भगवंताचेही ऐकायला तयार नाहीत, कारण त्यांच्यासाठी जमिनीचा तुकडा हाच परमेश्वर आहे. शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणत त्यांच्याचसाठी न्यायालयात याचना करायची, हे दुटप्पी धोरण कसले? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लाखो शेतकरी मान्य करणार नसतील, तर त्या लाखो शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणार काय? त्यांच्यावर न्यायालयाच्या बेअदबीचा खटला दाखल करणार का?’ असा सवालही शिवसेनेनं उपस्थित केला आहे. ‘वातावरण बिघडू नये, असं सरकारला वाटत असेल, तर सरकारने शेतकऱ्यांच्या भावना समजून कायदे रद्द केले पाहिजेत,’ अशी मागणीही शिवसेनेनं केली आहे.

 

Join Free WhatasApp  माणदेश एक्सप्रेस न्युज

Tags: #cm#sanjayravut#Shivsena
Previous Post

“विरोधकांनी आता स्वतःला आरशात पाहिलं पाहिजे” : अमोल कोल्हे

Next Post

“भ्रष्टाचार,व्याभिचार आणि स्वैराचारावर पांघरून घालणारे मलिक यांच्यावर आता ड्रग माफिया असणाऱ्या जावयाला वाचवायची वेळ आली” : “या” भाजप नेत्याची टीका

Next Post

“भ्रष्टाचार,व्याभिचार आणि स्वैराचारावर पांघरून घालणारे मलिक यांच्यावर आता ड्रग माफिया असणाऱ्या जावयाला वाचवायची वेळ आली” : “या” भाजप नेत्याची टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यामध्ये “या” तारखेपर्यंत शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस बंद राहणार

पुण्यामध्ये “या” तारखेपर्यंत शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस बंद राहणार

February 28, 2021
“सरकारच्या इतिहासात महिलांच्या बद्दल एवढा दुजाभाव” : पंकजा मुंडे आक्रमक

“सरकारच्या इतिहासात महिलांच्या बद्दल एवढा दुजाभाव” : पंकजा मुंडे आक्रमक

February 28, 2021
डिसलाईक करण्याच्या पर्यायावरून “या” अभिनेत्याचा मोदींना सवाल

डिसलाईक करण्याच्या पर्यायावरून “या” अभिनेत्याचा मोदींना सवाल

February 28, 2021
“मला विरोधी पक्षनेत्यांची कीव करावीशी वाटते” : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“मला विरोधी पक्षनेत्यांची कीव करावीशी वाटते” : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

February 28, 2021
‘आपल्या पाल्यांचे प्राथमिक शिक्षण मराठीत देण्याचे ठरविले पाहिजे’ : राज्यपाल

‘आपल्या पाल्यांचे प्राथमिक शिक्षण मराठीत देण्याचे ठरविले पाहिजे’ : राज्यपाल

February 28, 2021
पूजा चव्हाणच्या आईवडिलांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली ही मागणी

पूजा चव्हाणच्या आईवडिलांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली ही मागणी

February 28, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143