पुणे : राज्यातील 34 जिल्ह्यांमधील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे. निकालानंतर कार्यकर्ते, उमेदवार जंगी पार्टी, मिरवणूक काढण्याच्या तयारीत असतील, तर त्यांना ते महागात पडू शकते. कारण राज्यातील बहुतांश जिल्ह्यातल विजयी मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विजयी मिरवणुका काढू नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी पहाटे 12 पासून ते रात्री 12 पर्यंत दिवसभर मिरवणुका काढणे, रॅली काढणे, फटाके फोडणे, गुलाल उधळणे या सर्व गोष्टींना बंदी घालण्यात आल्याचे, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी एका आदेशात म्हटले आहे.
सोमवारी पहाटे बारापासून रात्रीचे बारापर्यंत संपूर्ण दिवसात विजयी मिरवणूक काढणे, रॅली काढणे, फटाके फोडणे, गुलाल उधळणे, विना परवानगी फ्लेक्स अथवा बॅनर लावू लावण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच,सोमवारी रात्री दहा ते मंगळवारी सकाळी सहापर्यंत हॉटेल, ढाबे, खानावळी, चायनीज, पान टपरी या सेवा बंद राहणार आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
