मुंबई : मराठीतील कोणत्याही गाण्यावर भन्नाट डान्सर आणि आपल्या नृत्याने अनेकांन घायाळ करणारी मानसी नाईक अखेर विवाहबद्ध झाली आहे. प्रदीप खरेरासोबत मानसीने साताजन्माची गाठ बांधली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून मानसी आणि प्रदीप यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे.
काही दिवसांपूर्वी मानसीने एक इन्स्टा पोस्ट शेअर करत तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. तेव्हापासून तिची आणि प्रदीपची चर्चा होती. त्यातच या दोघांनी साखरपुडा केला होता .अखेर २०२१ या नव्या वर्षामध्ये या दोघांनी साताजन्माची गाठ बांधली आहे.
प्रदीप हा प्रोफेशनल बॉक्सर आहे. प्रदीप वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत आशिया गटातलं विजेतेपद मिळवलेलं आहे. तर मानसीच्या नृत्यकौशल्याची तरुणाईमध्ये तुफान क्रेझ आहे. मानसीने आतापर्यंत ‘हॅलो बोल’, ‘मराठी तारका’ यांसारख्या अनेक मराठी रिअॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून आपले नृत्यकौशल्य दाखवले आहे. याव्यतिरिक्त रुपेरी पडद्यावरही मानसीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मानसीचे ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ हे गाणे प्रचंड प्रसिद्ध झाले होते.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
