नवी दिल्ली : भारताची ऑलिम्पिक पदकप्राप्त बॅडमिंटनपटू सायना नेहवालला कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी सोशल मीडियात दिसू लागली. काही तासानंतर सायनाने यासंदर्भात ट्वीट करून नेमकं काय झालं ते स्पष्ट केलं आहे.
“मला माझ्या कोव्हिड चाचणीचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. काल कोव्हिडची तिसरी चाचणी घेण्यात आली होती. मॅचआधी सराव करत असताना आयोजकांनी मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मला बँकॉकमधल्या हॉस्पिटलमध्ये रवाना होण्यास सांगितलं. नियमांनुसार चाचणीसाठी स्वॅब दिल्यानंतर पाच तासात अहवाल मिळणं अपेक्षित आहे”, असं सायनाने म्हटलं आहे.आयोजकांच्या मते सायनाला कोरोना संसर्ग झाला आहे, मात्र तसा अहवाल सायनाला मिळालेलाच नाही अशी विचित्र परिस्थिती आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
