नवी दिल्ली : पतंजली पेय प्रायव्हेड लिमिटेडकडून प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१८ चे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली पेय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबत विचारले असता, पतंजलिचे प्रवक्ते एसके तिजारीवाला यांनी यासंदर्भात बोलण्यात नकार दिला. पतंजलीसह कोक, पेप्सिको आणि बिस्लेरी यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या अन्य कंपन्याची दंडात्मक रक्कम आणि अन्य बाबींविषयी माहिती देण्यात मंडळाने नकार दिल्याचे समजते.
पतंजली पेय प्रायव्हेट लिमिटेडला फेब्रुवारी आणि ऑगस्ट २०२० मधील प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१८ च्या अंतर्गत नोंदणी अर्ज करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. मात्र, त्यावर अद्यापही कोणतेही उत्तर देण्यात आले नसल्याची माहिती केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आली. पास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१८ च्या कलम ९(१) नुसार नियम जाहीर झाल्यानंतर सहा महिन्यांत निर्माते नियोजित जबाबदारीनुसार कामे पूर्ण करतील. तसेच कलम ९ (२) नुसार मल्टिलेयर प्लास्टिक सॅशे, पाउच आणि पॅकेजिंग कलेक्शन यांची जबाबदारी उत्पादक, उत्पादने आयात करणाऱ्या कंपन्या आणि ब्रँड मालकांची असेल. मात्र, या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी पतंजलीसह अन्य कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
