आटपाडी : श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी येथील रसायनशास्त्र विभागातील प्रा.संदीप विभुते यांनी शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.
माडगुळे तालुका आटपाडी येथील प्रा. संदीप विभुते हे गेल्या आठ वर्षांपासून श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्यांनी “सिंथेसिस अँड कॅरेक्टराझेशन ऑफ ट्रांझीशन मेटल काॅम्पलेक्सेस अँड देअर अप्लिकेशन्स” या विषयावरील पीएच.डी. संशोधनाचा प्रबंध विद्यापीठात सादर केला. आणि नुकतीच त्यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी पीएच.डी. पदवी प्रदान केली. त्यांचे संपूर्ण शोधनिबंध हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या नामांकित जर्नल्स मधून प्रसिद्ध झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या एका शोधनिबंधाची ‘थीम’ “टेट्राहेड्राॅन लेटर्स” या जर्नलच्या मुखपृष्ठावर छापण्यात आली आहे.
पीएच.डी. संशोधन प्रबंधासाठी प्राचार्य डॉ.आर.व्ही. शेजवळ, लाल बहाद्दूशास्त्री महाविद्यालय, सातारा व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर रसायनशास्त्र अधिविभागाचे प्रा.डॉ.डी.एम. पोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अमरसिंह देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय लोंढे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुभाष कारंडे, सहसचिव एच.यू.पवार, निरीक्षक अशोक चौगुले यांनी त्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.दादासो काळे, डॉ.दीपक राजमाने व डॉ. गौतम गायकवाड यांचेही सहकार्य लाभले.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस