आटपाडी : आटपाडी येथील गुरुकुल हायस्कूल मैदानावर क्रिकेट खेळताना अचानक पडल्याने तासगाव येथील युवकाचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, आटपाडी येथील गुरुकुल विद्यालयाच्या मैदानावर ए.आय.ओ.सी.डी.ए. चे अध्यक्ष जगन्नाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विजयभाऊ पाटील क्रिकेट चषक २०२१ चे आयोजन आटपाडी तालुका केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट मेडिकल असोसिएशन च्या वतीने करण्यात आले होते.
तासगाव व कवठेमहांकाळ यांच्या क्रिकेट सामना सुरु असताना तासगाव संघातील खेळाडू अतुल पाटील क्रिकेट खेळत असताना खाली पडले. तातडीने त्यांना आटपाडी येथील सुविधा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी आटपाडी ग्रामीण रूग्णालय येथे मोठी गर्दी जमली होती.
अतुल पाटील हे ढवळी गावाचे रहिवाशी असून ते गावाचे उपसरपंच आहेत. तासगाव येथे त्यांचे मेडिकल आहे. या घटनेचे नोंद आटपाडी पोलीस ठाणे येथे झाली आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस
