विटा : विटा पोलिसांनी अट्टल चोरट्यास अटक केली असून त्याच्याकडून चारचाकी, दुचाकी, लॅपटॉप, मोबाईल असा तीन लाख ११ हजाराचा १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलीस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती मनिषा इबुले, उपविभागिय पोलीस अधिकारी अंकुश इंगळे यांनी मालमतेविरुद्धच्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेवुन मालमत्तेच्या गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी विटा पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखा व पोलीस स्टाफ यांना सक्त पेट्रोलिंग करुन मालमत्तेविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचित केले होते.
दिनांक १४.१२.२०२० रोजी सायंकाळी १०.०० या चे सुमारास इसम नामे संभाजी गोविंद जाधव रा. चंद्रसेननगर विटा, ता. खानापुर हा चौरीचा लॅपटॉप व मोबाईल विक्री करणेकरीता विटा बाजारपेठ येथे येणार असलेबाबत गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळालेने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी यांना पाचारण करुन पथकामार्फत सदर संशयीतांचा शोध घेवून आरोपी संभाजी गोविंद जाधव रा. चंद्रसेननगर चिटा. ता, खानापुर यास ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसून तपास केला असता त्याने विटा पोलीस ठाणे हद्दीतील दोन घरफोडया करुन त्यामधील मुददेमाल चोरी केला असल्याबाबत तसेच पुणे येथे एक चारचाकी गाडी व २ मोटर सायकल तसेच २ मोटर सायकल कराड येथुन चोरी केली असल्याची कबुली देवुन केले गुन्हयाबाबत हकीकत कथन केली.
सदर आरोपींना विटा पोलीस अटक करुन त्याचेकडे तपास करून त्याचे कडुन सोन्याचे ४.५ ग्रॅम वजनाची चैन, सोन्याची नथ, २४१ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, १ मोबाईल, १ लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप, रोख रक्कम २५०० असे एकुण ६१,९००/- किमतीचा मुददेमाल तसेच गुरनं ३८१/२०२० भा.दं.वि.सं. कलम ४५४, ४५७, ३८० मधील १ एल.सी.डी. टि. व्ही., १ ए.सी., 1 फ्रिज असे ४०,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल तसेच पुणे व कराड येथुन चोरी केलेल्या चारचाकी अल्टो व ४ मोटर सायकल असे एकुण २,१०,०००/- रुपये किंमतीची वाहने असे एकुण ३,११,१००/- रुपये किंमतीचा मुददेमाल त्याचेकडुन हस्तगत करण्यात आला आहे.
सदर गुन्हयांचा पुढील तपास पोहेकॉ २३७ बाबासाहेब खरमाटे हे करीत आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांपैकी १ चारचाकी वाहन व २ मोटर सायकली पुणे व २ मोटर सायकली कराड येथुन चोरी केल्या असुन त्यांचे मालकांचा शोध विटा पोलीस घेत आहेत. सदरची कामगिरीपोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. इगलटे, पोहेको बाबासाहेब खरमाटे, पोना १६८ राजेंद्र भिगारदेवे, पोनाहणमंत लोहार, पोना अमर सुर्यवंशी, पोना शशीकांत माळी, सुरेश भोसले, यांनी केली आहे. तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोना प्रकाश पाटील, पो.कॉ. कॅप्टनसाहेब गुंडवडे यांनी मदत केली आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



