आटपाडी : आटपाडी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी तालुक्यातील अवैध धंद्याविरोधातील मोहित तीव्र केली असून आज विठ्ठलापूर येथील गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत तो उध्वस्त करीत ५४ हजार ४६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, विठ्ठलापुर भवानी माळ शिवारात हणमंत युवराज मंडले रा भवानी माळ विठ्ठलापुर हा बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टीचा कारखाना लावुन गावठी हातभटटींची दारु गाळप करीत असल्याची माहिती आटपाडी पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार आटपाडी पोलिसांनी आज दुपारी १५.०० वा चे सुमारास छापा टाकुन त्यास जागीच पकडले व त्याच्याकडून खालीलवर्णनाचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये लोखंडी पत्र्याचे पाचे बॅरेल त्यातील ०१ बॅरेल चुलीवर असुन बाकीचे ०४ रेल बाजुला असुन त्यामध्ये कच्चे रसायण १००० लिटर , दोन कॅनामध्ये १० लिटर काढीव तयार दारु, जर्मनचे पातेल, एक मातीचे गाडगे, हंडी, दोन प्लॅस्टीकच्या दारु गाळपाच्या ओलसर दारु वासाच्या पाईपा, जळावु लाकुड, ०१ काडी पेटी असा ५४४६२/- रु एकुण माल मिळून आला.
त्याचे विरुध्द आटपाडी पोलीस ठाणे गुन्हा नोंद करणेत आला आहे. सदर गावठी हातभटटीचे रेड कामी पोलीस अधिक्षक श्री गेडाम सो, अप्पर पो. अधि. ड्बुले मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकरी श्री इंगळे सो., यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री देवकर सो, सपोनि सुधीर पाटील तसेच सपोफी चोरमले पोना/वगरे, पोना नितीन मोरे, प्रमोद रोडे यांनी कारवाई केली आहे. तसेच या पुढे अवैध धंदयांबाबत आणखीन सापळे रचुन प्रभावी कायदेशिर कडक कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक देवकर यांनी सांगितले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस