माडगुळे : माडगुळे ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीबाबत आज दि ९/२/२०२१ रोजी ग्रामपंचायतीचीचे कार्यालयात सभा होऊन सरपंचपदी सौ. संगिता विठ्ठल गवळी व उपसरपंपदी श्री. विशाल बापू झोडगे यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. सिद्धनाथ काळेल यांनी कामकाज पाहिले. याप्रसंगी नुतन सदस्य अमोल विभुते, नितीन लिंगडे, समाधान मंडले, अर्चना विभुते, कविता नसले, रतन झोडगे, वृषाली जावीर व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नुतन सरपंच व उपसरपंच यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस