मुंबई : कोण कुठला सडक्या डोक्याचा व्यक्ती हा पुण्यात येतो व एल्गार परिषदेत, हिंदुंना सडकं म्हणतो. आणि त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. हिंदू काय रस्त्यावर पडले आहेत का? अशा शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारवर तोफ डागली.
“गृहमंत्री म्हणतात आम्ही चौकशी करू. कशाची चौकशी करता? सगळीकडे त्याचा स्पष्ट व्हिडिओ दिसतो आहे. तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतो आहे. जर या महाराष्ट्रात कुणी येऊन हिंदुंना सडकं म्हणणार असेल आणि महाराष्ट्राचं सरकार ऐकून घेणार असेल, तर भाजपा गप्प बसणार नाही. तत्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करून, जर त्याला अटक केली नाही. तर, त्याविरोधात आम्ही आंदोलन सुरू करू, असा इशारा आम्ही सरकारला देतो आहोत.”

“हा तोच व्यक्ती आहे जो बाहेर येऊन म्हणतो, आम्ही बाबरी मशीद बांधू. अशा सडक्या डोक्याच्या लोकांना या महाराष्ट्रात का प्रवेश देता? प्रवेश दिला तरी त्यांना कार्यक्रम का करू देता? या ठिकाणी आपल्याला कल्पना होती. ही जी काही परिषद आहे, ही परिषद केवळ आग ओतण्यासाठी व समाजात तेढ निर्माण करण्यासाठी तयार झालेली आहे आणि तेच त्याचं काम आहे. हा अनुभव असताना देखील, त्यांना अशाप्रकारे आयोजन केल्या जाऊ दिल्या जातं. मला असं वाटतं कुठंतरी सरकारची मिलीभगत आहे.” असा आरोपही फडणवीस यांनी राज्य सरकारवर यावेळी केला.
“हे जे असं हिंदुंच्या विरुद्ध बोललं जात आहे. सरकारच्या मर्जीनं हे बोललं जात आहे, असंच आम्हाला वाटेल. म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे. तत्काळ या संदर्भात कारवाई झालीच पाहिजे.” अशी मागणी करत, फडणवीस यांनी “शिवसेना सत्तेला मिंदी झाली आहे. सत्तेला नतमस्तक आहे. त्यामुळे ते यासंदर्भात बोलूच शकत नाही.” असं बोलत शिवसेनेवर उघडपणे टीका देखील केली.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
