नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून खोट्यालाही खरे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे असेच चालले आहे. पत्रकार राजदीप सरदेसाई, काँग्रेस नेते शशी थरुर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. जो खरं बोलतो किंवा लिहितो त्याला गद्दार, देशद्रोही संबोधलं जाते. जो सरकारला प्रश्न विचारतो, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा ठोकला जातो असे संजय राऊत म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
