मुंबई : राज्यातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची बाधा झाली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.
कोरोना चाचणीसंदर्भात माहिती देताना पाटील यांनी एक ट्विट केलं आहे. ‘माझी कोरोनाची चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पुढील उपचार घेत आहे. लवकरच मी कोरोनावर मात करुन पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
