मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचं संकट पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलं आहे. बॉलिवूडमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं दिसून येतंय. अनेक सेलिब्रिटींनंतर अभिनेता मिलिंद सोमणला कोरोनाची लागण झाली आहे. मिलिंद सोमणने एक ट्विट करत याची माहिती दिली आहे.
“पॉझिटिव्ह टेस्ट आली.” असं ट्विट त्याने केलंय. त्याचसोबत क्वारंटाईन झाल्याचं देखील त्यानं सांगितलं आहे. मिलिंज सोमणच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी त्याला ‘लवकर बरा हो’ म्हणत चिंता व्यक्त केली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस