मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला एक वर्षाचा अवधी आहे. तर शिवसेनेन भाजपला आणखी एक धक्का दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर मुंबई भाजपचे माजी सचिव समीर देसाई यांनी हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. समीर देसाई हे काँग्रेसचे माजी खासदार गुरूदास कामत यांचे भाचे आहेत. तसंच ते काँग्रेसचे माजी नगरसेवकही होते.
काँग्रेसमधून त्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला होता. मात्र, भाजपमधील अंतर्गत गटबाजीला वैतागून त्यांनी आज शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीला एक वर्षाचा अवधी उरला असताना शिवसेनेत आता इन्कमिंग सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
