मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भाजपला जोरदार धक्के देताना दिसत आहे. सेनेने भाजपाला आणखी एक धक्का दिला आहे. अँटॉप हिल वडाळा येथील अनिल कदम आणि दोन टर्म नगरसेविका राहिलेल्या माजी नगरसेविका प्रेसिला कदम तसेच भाजपा प्रणित बेस्ट संघटनेचे कार्याध्यक्ष विवेक घोलप यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.

कदम यांचा हा प्रवेश आमदार कोळंबकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे भाजपा मुंबई मनपा जिंकण्याचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे मात्र भाजपात मोठया प्रमाणात आउटगोईंग सुरु झाली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
