मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण मुख्यमंत्री असताना 2018 साली देखील शिवसेनेने वाझेंना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी केली होती, असे वक्तव्य केले होते. मात्र त्यांचा हा दावा आता शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी फेटाळून लावला आहे.
सचिन वाझेला घेण्यासाठी शिवसेनेने मागणी केली, या गोष्टी कपोलकल्पित आहेत. फडणवीस यांनी अॅडव्होकेट जनरल यांचं मत घेतल्याचं सांगितलं. त्यांनी कधी लेखी मागितले आणि अॅडव्होकेट जनरल यांनी कधी लेखी दिलं, हे फडणवीसांना दाखवावे, असे आव्हान अनिल परब यांनी फडणवीसांना दिले आहे.
सचिन वाझे प्रकरणी कोणाचीही चौकशी करावी. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत. आम्ही काही घाबरुन कोणती चौकशी करु नये, अशी विनंती करत नाही, असेही परब म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस