मुंबई : परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाला ठोस आधार नसल्याचं सांगत पवारांनी देशमुखांची पाठराखण केली. परमबीर सिंग यांनी दिलेल्या तारखांच्या कालावधीत देशमुख हे क्वारंटाईन होते, असं म्हणाले.
पवार यांच्या या विधानानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत शरद पवारांना उलट सवाल केला आहे. “१५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, १५ फेब्रुवारीला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?,” असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
“परमवीर सिंग यांच्या पत्रावर शरद पवार यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, असे स्पष्टपणे दिसून येते. या पत्रात नमूद केलेला ‘एसएमएस’चा पुरावाच सांगतो की, ही भेट फेब्रुवारीच्या अखेरीस झालेली आहे. आता नेमके कोण दिशाभूल करते आहे?,” असंही फडणवीस म्हणाले आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस