मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट्स, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. मात्र यावेळी बिग बी क्रिकेटपटूंच्या मुलींमुळे चर्चेत आहेत.
क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. त्यामुळे बिग बींनी आपल्या अनोख्या शैलीत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या मुलींची एक यादी ट्विट केली. ही आहे महिलांची टीम असं म्हणत त्यांनी महेंद्र सिंह धोनीच्या मुलीला त्या टीमचा कर्णधार म्हणून घोषीत केलं. मात्र गंमत म्हणून केलेलं हे ट्विट पाहून काही नेटकरी संतापले आहेत. “अमिताभ तुम्ही इथे देखील घराणेशाही चालवणार का?, क्रिकेटला तरी घराणेशाहीपासून दूर ठेवा.” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत त्यांना ट्रोल केलं जात आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
