नवी दिल्ली : बदलत्या पिडीनुसार नवनवीन यंत्रणेमुळे मानवाच्या जीवनशैलीत मोठे बदल होत आहेत. Whatss aap सारखे कितीतरी ॲप आपल्या मोबाईलमध्ये आहेत. पण दरवेळेस वेगवेगळ्या अॅप्सवर येणारे मेसेज जाऊन वाचणे आपल्यापैकी अनेकांना शक्य होत नाही.
पण आता यावर देखील तोडगा निघाला आहे. कारण यासाठी आता एक भन्नाट अॅ प तुमच्या सेवेत दाखल झाले असल्यामुळे प्रत्येक वेळी वेगवेगळी अॅाप्स ओपन करून त्यात जाऊन मेसेजेस वाचण्याची तुम्हाला गरजच भासणार नाही. तुम्हाला या अॅतप्सच्या मदतीने १५ पेक्षा अधिक मेसेजिंग प्लॅटफॉर्म्स एकाच ठिकाणी ठेवता येणार आहेत.
या नव्या अॅजपचे नाव ‘बीपर’ असे असून तुम्ही या अॅपच्या माध्यमातून अनेक अॅ पमधील मसेज या एकाचवेळी वाचू शकता. युझरला या अॅ्पच्या मदतीने १५ मेसेजिंग प्लॅटफॉर्म्स एकाच ठिकाणी मॅनेज करण्याची सुविधा मिळणार आहे. सेंट्रल हब प्रमाणे हे अॅाप काम करते. फेसबुक मेसेंजर, सिग्नल, ट्विटर, टेलीग्राम, व्हॉट्सअॅबप सारख्या अॅकप्सचा यामध्ये लाभ घेता येईल. याव्यतिरिक्त या अॅ पची विशेष म्हणजे आयमेसेजचाही वापर बीपरमध्ये करता येऊ शकतो.
याव्यतिरिक्त हे अॅेप अँड्रॉईड, विंडोज आणि लिनक्सवर काम करते. त्याचबरोबर हे अॅतप युझर्सना मोफत मिळणार नाही. या अॅपचा वापर करण्यासाठी युझरला दर महिन्याला १० डॉलर्स म्हणजेच जवळपास ७५० रूपये मोजावे लागणार आहेत. याच्या माध्यमातून युझर्सना सर्वच अॅजप्स एकाच प्लॅटफॉर्मवर वापरता येतील. यावर गुगल हँगआऊट, आयमेसेज, इन्स्टाग्राम, आयआरसी. मॅट्रिक्स, फेसबुक मेसेंजर, सिग्नल, स्काईप, व्हॉट्सअॅटप, टेलिग्राम, ट्विटर, स्लॅक अशा अनेक अॅ्प्सचा सपोर्ट आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
