म्हसवड/अहमद मुल्ला : माण मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी आकाश दडस, उपाध्यक्ष केरप्पा कोळल, खजिनदार विजय ढालपे, कार्याध्यक्ष अशोक हांडे, जिल्हा प्रतिनिधी सुशील त्रिगुणे, सहसचिव सागर बाबर यांच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या आहेत.
दि (३०) डिसेंबर रोजी माण मराठी पत्रकार संघाची बैठक शासकीय विश्रामगृह म्हसवड येथे पार पडली. यावेळी माण मराठी पत्रकार संघाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. सर्वांमध्ये माण तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आकाश दडस तर उपाध्यक्षपदी केराप्पा काळेल बिनविरोध निवड करण्यात आली. माण तालुक्यातील पत्रकार दुष्काळाच्या बातम्या सातत्याने वार्तांकन करत असतात. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आम्ही एकत्र येऊन काम करणार असून पत्रकारांना योग्य मानधन मिळवण्यासाठी पत्रकारांचा एकत्रित लढा राहणार आहे. असे मत माण तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव बनसोडे यांनी केले.
नूतन अध्यक्ष आकाश दडस म्हणाले, संघटना जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली असून ग्रामीण भागातील मराठी पत्रकार यांच्या न्यायासाठी कार्यरत राहणार आहे. उपाध्यक्ष केराप्पा काळेल म्हणाले की, सर्वसामान्य सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी व परिसरातील अन्यायग्रस्त नागरिकांसाठी पत्रकारितेच्या माध्यमातून प्रशासन दरबारी आवाज उठवण्याचे काम करणार असून सर्वसामान्यांच्या अडचणी सदैव माण तालुका पत्रकार संघ सदैव तत्पर असल्याचे ग्वाही यांनी दिली.
यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची विधानपरिषदेचे सभापती नामदार श्रीमंत रामराजे निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई माण खटावचे आमदार जयकुमार गोरे,शिवसेना नेते शेखर गोरे, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, माणदेशी महिला बँक संस्थापक अध्यक्ष चेतना सिन्हा ,डॉ. दिलीप यळगावकर,रणजित देशमुख,प्रा.विश्वंभर बाबर,सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे यांनी आभिनंदन केले.
यावेळी संस्थापक पोपट बनसोडे,ज्येष्ठ पत्रकार विजय भागवत ,दिलीपराज कीर्तने, राजेश इनामदार, अजित काटकर, अहंमद मुल्ला, अजित कुंभार, सागर बाबर, शिवशंकर डमकले, जयराम शिंदे, विशाल माने, राजेंद्र केवटे, धनंजय पानसांडे, सिद्धार्थ सरतापे आदी तालुका पत्रकार बांधव उपस्थित होते.
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस