मुंबई : “महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा घेणे हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ ठरू शकेल. त्यामुळे राज्यात दहावी आणि बारावी च्या बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात,” अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती.यानंतर आता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील हीच मागणी केली आहे.
“महाराष्ट्रच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आणि स्वागतार्ह आहे. त्या प्रमाणेच १० वी आणि १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती द्यावी,” अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस