आटपाडी : आटपाडीच्या बायपास रोडवरती असणाऱ्या पुलाच्या संरक्षण कठड्याचे काम तब्बल दीड वर्षानंतर सुरु झाले असून बांधकाम विभागाला आता जाग आली असल्याने विठ्ठलनगर व हाकेवाडी परीसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
आटपाडी शहरातुन कराड, सांगलीला जाण्यासाठी बायपास रस्ता असून या रस्तावरून आटपाडीच्या तलावावरून वाहत येणाऱ्या ओढ्यावरती पुल आहे. परंतु या पुलाच्या संरक्षण कठड्याला वर्षभरापूर्वी गाड्या धडकल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर याच पुलावरून गेल्यावर्षी पुलाचे जवळपास सर्वच संरक्षण कठडे तोडत एक चारचाकी गाडी पुलाच्या खाली कोसळली होती. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले. परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही.
संरक्षण कठडा संपूर्णपणे खराब होवून दीड वर्ष झाले होते. बांधकाम विभागाने याकडे डोळेझाक केल्याने दीड वर्ष वाहनधारक या पुलावरून जाताना आपला जीव मुठीत धरून प्रवास करीत होते. परंतु आता मात्र या पुलाच्या संरक्षण कठड्याचे काम सुरु झाल्याने हाकेवाडी, विठ्ठलनगर परीसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस
