आटपाडी : राज्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या दुसऱ्या लाटेचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याने राज्य शासनाने राज्यात अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊन जाहीर केला आहे. याबाबत सांगली जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आदेश पारित केला आहे.
राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असताना आटपाडी तालुक्यात मात्र पहिल्याच दिवशी लॉकडाऊनचा फज्जा उडाला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मात्र प्रशासन रस्त्यावर उतरले असून अत्यावश्यक सेवा वगळता ज्यांनी-ज्यांनी आपली दुकाने सुरु केली होती त्यांना दुकाने बंद करण्यास सांगून शासन आदेशाचे पालन करण्याचे आवाहन आटपाडीचे गाव कामगार तलाठी श्री. केंगार यांनी केले. शासनाच्या या आवाहनाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपापली दुकाने तत्काळ बंद करत प्रशासनाला सहकार्य केले.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस