मुंबई : दिल्लीतील शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ६ मोठ्या ब्रॅण्डने अभिनेत्री कंगना सोबतचा करार रद्द केला आहे. याविषयी कंगनाने ट्विट करुन माहिती दिली आहे.
२६ जानेवारीला दिल्लीत प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान मोठा हिंसाचार झाला. याप्रकरणावर कंगनाने एक व्हिडीओ शेअर करत शेतकऱ्यांवर टीका केली होती. स्वतःला शेतकरी म्हणवून घेणारे दहशतवादी आहेत, त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना तुरुंगात टाका असं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. कंगनाचा हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच धारेवर धरलं आणि टीकास्त्र डागलं. यामध्येच आता सहा दिग्गज ब्रँण्डने तिच्यासोबतचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं आहे.
“तुम्ही शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्यामुळे आता आम्ही तुम्हाला बँण्ड अॅम्बेसेडर करु शकत नाही. पण, आता मी त्यांना सांगू इच्छित आहे की, जे आज झालल्या हिंसेला पाठिंबा देत आहेत, ते सुद्धा दहशतवादी आहेत”, असं ट्विट कंगनाने केलं आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
