मुंबई : मुंबईमध्ये कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी अद्याप कोरोनाचं संकट टळलेलं नाही. यातच आता बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर येतंय. बॉलिवूडमध्ये बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, वरुण धवन, अर्जुन कपूर यांच्यानंतर आता रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाल्याच्या चर्चा सुरु आहेत.
रणबीरच्या आजारपणाबद्दलची बातमी समोर आल्यानंतर रणधीर कपूर यांनी याबद्दलची खरी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं, की ही गोष्ट खरी आहे, की रणबीर सध्या आजारी आहे. सध्या तो क्वॉरंटाइन असून आराम करतोय. रणबीरचे काका रणधीर कपूर यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी रणबीरला कोरोना झालायं का या प्रश्नावर त्यांनी आधी “होय” असं उत्तर दिलं. मात्र रणबीरला कोरोना झालाय की नाही याची खात्री नसल्याचं ते लगेचच म्हणाले. रणबीर सध्या आजारी आहे आणि तो आराम करत आहे. मात्र त्याला कोरोना झालाय की नाही हे माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस