वर्धा : वर्धा जिल्ह्यातील भुगाव येथील उत्तम गालवा मेंटालीक स्टील या कंपनीत ब्लास फर्निश या युनिटमध्ये सकाळच्या सुमारास अपघात घडलाय. कंपनी प्रशासनाच्या मतानूसार कंपनीत विस्फोट झाला नसून हा अपघात आहे. या घटनेत 38 मजूर जखमी झाले असून त्यातील 10 मजूर गंभीर जखमी आहे. जखमींना सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गंभीर घटना घडूनही अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

आज सकाळी पाचच्या दरम्यान दुरुस्ती करण्याकरता प्लांट बंद करण्यात आला होता.आठ वाजता या ठिकाणी काम चालू करण्यात आले. दरम्यान कंपनीच्या ब्लास फर्निश या युनिटमध्ये सकाळी दहा वाजताच्या सुमारास हा अपघात घडलाय. दरम्यान ट्यु एयरमधून गरम हवा आणि बारीक कण उडाले यामुळे मजूर भाजले गेले आहेत. या घटनेत 35 कामगार भाजून जखमी झाले आहे. त्यातील 28 जण सावंगी, 10 मजुरांना सेवाग्राम येथे पाठवण्यात आले आहे. 40 टक्क्यांपेक्षा जास्त भाजल्यामुळे 10 जण जास्त गंभीर जखमी आहेत. दोन ते तीन जणांना नागपूरला उपचाराला पाठवणार असल्याची माहिती उत्तम गालवा कंपनीचे जनसंपर्क अधिकारी आर. के .शर्मा यांनी सांगितलं आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
