मुंबई : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पराभूत करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नसल्याचे म्हणाले होते. त्यावर आता भाजपचे माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आयुष्यभर अब्दुल सत्तार यांनी टोपी घालावी लागेल, त्यांना आम्ही टोप्या पुरवू, असा टोला गिरीश महाजन यांनी सत्तार यांना लगावला आहे.
गिरीश महाजन एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना म्हणाले की, युतीतून अब्दुल सत्तार निवडून आले आहेत, याचे त्यांनी भान ठेवावे. रावसाहेब दानवे यांची कामे मोठी आहे. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात मोठी कामे केली आहे. त्यांना पराभूत करणे तेवढे सोप नसल्यामुळे सत्तार यांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, हवे तर त्यांना आम्ही टोप्या पुरवू.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाजपचे नेते खासगीत कौतुक करतात, या सत्तार यांच्या वक्तव्याचाही महाजन यांनी समाचार घेतला. असे काहीही भाजपचे लोक म्हणत नाहीत. कोणत्याही भाजप नेत्याने असे कधीच म्हटले नाही असे महाजन म्हणाले. त्यामुळे पुढील काळात सत्तार विरुद्ध महाजन असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस
