सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वहागांव ( ता. कराड) गावच्या हद्दीत भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर,एक जण गंभीर जखमी आहे. हा अपघात इतका भीषण होता कि,अपघातग्रस्त कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरहून कार (क्र. एमएच 07-एबी 5610) कोल्हापूरहून पुण्याकडे जात होती. दुपारी दीड वाजण्याच्या सुमाराला ही कार वहागांव (ता. कराड) गावच्या हद्दीत आल्यानंतर ही कार अतिशय वेगात असल्याने चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. ही वेगवान कार महामार्ग ओलांडून पुण्याहून कोल्हापूरकडे जाणार्याल लेनवर जाऊन एका ट्रकला दोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील तिघे जागीच ठार झाले. तर, एकाचा त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला. तर आणखी एकजण गंभीर जखमी झाला आहे.
अपघात ग्रस्त कार अतिशय वेगवान असल्याने अपघातानंतर या कारचा चक्काचुर झाल्याने अपघातानंतर कारमधील पाच जणांपैकी कोणालाही बाहेर पडता आले नाही. पाचही जण कार मध्येच अडकून पडले होते. कार सर्व बाजूंनी दबली गेल्याने कारमधून अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
