मुंबई : प्रसिद्ध अशी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगांवकर आई झाली आहे. धनश्रीने एका गोंडस बाळा जन्म दिला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत धनश्रीने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.
अभिनेत्री धनश्री काडगांवकरला मुलगा झाला असून रात्री उशीरा पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली आहे. तसंच ‘New life…New chapter’ असं कॅप्शन तिने ही पोस्ट शेअर करताना दिलं आहे.
“ही गोड बातमी तुमच्यासोबत शेअर करायला खूप आनंद होतोय. पहाटे आमच्या घरी एका गोंडस बाळाचं आगमन झालं आहे. माझी आणि बाळाची दोघंचीही प्रकृती स्वस्थ आहे. आमच्यावर खूप प्रेम, आशीर्वाद सारं काही दिल्यामुळे मनापासून धन्यवाद”, अशी पोस्ट धनश्रीने शेअर केली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
