आटपाडी : देशामध्ये वाहतूक व्यवस्थेमध्ये सध्या अमुलाग्र बदल होत आहे. देशात वाहनांच्या रजिस्ट्रेशन साठी प्रत्येक राज्याला एक विशीष्ट नंबर दिला आहे. जसा आपल्या राज्यासाठी MH म्हणजेच महाराष्ट्र, तसेच राजस्थानसाठी RJ असा विशिष्ठ नंबर आहे.
तसाच प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी एक वाहनांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी ऑफिस आहे. त्यालासुद्धा विशिष्ठ क्रमांक आहे. त्या नंबर वरून ते वाहन कोणत्या जिल्ह्याच्या ऑफिस ला रजिस्ट्रेशन झाले आहे याची माहिती मिळत असते.
परंतु वाहन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बऱ्याच वाहनांना पांढरी नंबर प्लेट, तरी काही वाहनांना काळी, पिवळी, हिरवी नंबर प्लेट असते. कोणत्या रंगांची नंबर प्लेट कोणत्या वाहणासाठी असते ते आपण पाहूया..
१) पांढरी नंबर प्लेट
या रंगाच्या नंबर प्लेट या सामान्य वाहनासाठी असतात. या वाहनांचा वापर हा फक्त वैयक्तिक कामासाठी केला जातो. तो व्यवसायिक कामासाठी केला जात नाही. या नंबर प्लेटवर काळ्या रंगाने नंबर्स लिहलेले असतात. त्यामुळे हे वाहन खाजगी मालकीचे आहे याचा अंदाज लावता येतो.
२) पिवळी नंबर प्लेट
या रंगाच्या नंबर प्लेट या कमर्शियल वाहनासाठी असतात. म्हणजेच या वाहनांचा वापर हा भाड्याने गाडी घेण्यासाठी किंवा मालवाहतूक करण्यासाठी केला जातो. या वाहनामधून जास्त करून प्रवाशी वाहतूक व मालवाहतूक केली जाते.
३) काळी नंबर प्लेट
अशी वाहने ही प्रामुख्याने भाड्याने दिली जातात. या वाहनाला काळ्या रंगाची नंबर प्लेट असते. त्यावर पिवळ्या अक्षरांनी लिहलेले असते. ही वाहने शहरातील मोठ्या अलिशान हॉटेलची असतात. म्हणजेच अशी महागडी वाहने ही खास करून हॉटेलसाठी वापरली जातात.
४) हिरवी नंबर प्लेट
बऱ्याच वाहनांना आपण पांढरी नंबर प्लेट पाहतो. दिवसातुन आपणाला कधीतरी हिरव्या नंबरची प्लेट असलेली गाडी दिसते. परंतु आपणाला त्यागाडीची नंबर प्लेट हिरवी का असते हे माहित नसते. तर हिरवी नंबर प्लेट ही देशात इलेक्ट्रीक वाहनासाठी देण्यात आलेली आहे. म्हणजेच हे वाहन कोणतेही प्रदूषण करीत नाही.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस
