पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपला शब्द पाळला असून, फडणवीसांची बदनाम करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात यूट्युबवर आक्षेपार्ह बदमानी करणारा मजकूर टाकणाऱ्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका 37 वर्षीय महिलेने तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी युवराज दाखले (रा. तापकीरनगर, काळेवाडी) या आरोपीला अटक केले आहे.
आरोपीकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नसतानाही सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित केला. त्यामुळे फिर्यादी आणि पक्षाचे इतर कार्यकर्ते यांच्यात असंतोष व रोष निर्माण होऊन भावना दुखावल्या गेल्या, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस