सांगोला : शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित बारामती सायकल क्लब व एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया (NGO) आयोजित सायकल स्पर्धेत एकशे सहा किलोमीटर अंतराचा सांगोला-मंगळवेढा-पंढरपूर- सांगोला असा टप्पा पार करत व्हर्च्युअल सायकल रॅली संपन्न झाली.
या चॅलेंज स्पर्धेत पंढरपूर सायकलर्स क्लब व सांगोला सायकलर्स क्लब या सदस्यांनी भाग घेतला यामध्ये सेवानिवृत्त मंडल अधिकारी बापूराव लाडे, संतोष कवडे, शरद भुजबळ, डॉ. प्रा. प्रशांत पवार, दिनेश आगवणे, सतीश चंद्रराव, प्रकाश शेटे, सचिन राऊत, प्रकाश परदेशी, महेश भोसले, तसेच सांगोला सायकलर्स सदस्य डॉ.प्रा. प्रकाश बनसोडे, अलनदीप टापरे, शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेचे संस्थापक निलकंठ शिंदे या सदस्यांनी भाग घेतला व 81 किलोमीटर चॅलेंज स्पर्धा पूर्ण केली.
सकाळी ०६:०० वाजता सर्व सदस्य छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एकत्र येऊन प्रवासाला सुरुवात करण्यात आली.गोपाळपूर मार्गे प्रवास सुरू झाला. मंगळवेढा येथे न्यू इंग्लिश स्कूल शिक्षण संस्थेचे संस्थाध्यक्ष प्राचार्य सुभाष कदम यांनी स्वागत केले.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास प्रदक्षिणा घालत ९० कि मी अंतर झाल्यावर मी पुढच्या १० कि.मी.साठी वाखरी गावाकडे जाऊन १०३ कि.मी. अंतर पूर्ण केले. ८० वर्षाच्या भारताचे नेतृत्व करणारे तरुण विचाराचे, महाराष्ट्राचे भाग्यविधाते शरदपवार यांना सांगोला व पंढरपूर सायकलर्स क्लब तर्फे ८१ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सायकलिंग द्वारे समर्पित करण्यात आल्या.
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस



