आटपाडी : तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीसाठी सरासरी ७७.७९ टक्के मतदान झाले. यामध्ये लेंगरेवाडी ग्रामपंचायत साठी सर्वात जास्त म्हणजे ८७.१६ तर बोंबेवाडी ग्रामपंचायतसाठी फक्त ४.७१ टक्के मतदान झाले.
सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती. बोंबेवाडी येथे केवळ एका जागेसाठी मतदान असल्याने तिथे सर्वात कमी मतदान झाले. त्याठिकाणी फक्त १६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. लेंगरेवाडी येथे किरकोळ बाचाबाची झाली. संवेदनशील असलेल्या विठ्ठलापूर येथेहि थेही शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
गाव निहाय मतदानाची टक्केवारी
विठ्ठलापुर ७९.८० टक्के
घरनिकी ७४.३१ टक्के
धावडवाडी ७४.२२ टक्के
देशमुख वाडी ८३.७२ टक्के
शेटफळे ७५.४१ टक्के
बोंबेवाडी ४.७१ टक्के
तळेवाडी ८७.०७ टक्के
लेंगरेवाडी ८७.१६ टक्के
माडगुळे ८१.०३ टक्के
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
