मुंबई : राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली आहे.शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना केली
वर्षा गायकवाड यांनी सांगितलं, “27 जानेवारीपासून राज्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यायचा आहे. मुलांची RT-PCR टेस्ट बंधनकारक आहे. पालकांची लेखी परवानगी असेल तर मुलांना शाळेत प्रवेश देता येईल. इतर पूर्वतयारी करायची आहे. यानंतर प्रशासन शाळा सुरू करू शकते.”
असं असलं तरी देशांमध्ये कोरोनाची असलेली दुसरी लाट आणि अन्य राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता मुंबई महापालिकेतील सर्व खासगी आणि सरकारी शाळा 16 जानेवारी 2021 पर्यंत पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येतील, असं मुंबई महापालिकेने जाहीर केलं आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
