मुंबई : भंडारा रुग्णालयातील घटनेवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुःख व्यक्त केले आहे. भंडाऱ्याची घटना अतिशय दुर्दैवी असून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत अशा पद्धतीने कारवाई करण्यात येईल. या घटनेत भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. परंतु गुदमरून 10 बालकांचा मृत्यू झाला. अशी प्राथमिक माहिती मिळाली. या घटनेची सविस्तर चौकशी केली जाईल असे आरोग्य मंत्री म्हणाले आहेत.
भंडारा जिल्हा रुग्णालय येथील गोर-गरीब आणि प्रामुख्याने ग्रामीण भागातील रुग्णांसाठी एक मोठा आधार आहे. या रुग्णालयात आरोग्याच्या सर्वच सुविधांची सोय करण्यात आली. नवजात बालकला काही त्रास झाल्यास याच ठिकाणी नवजात केअर युनिटमध्ये ( SNCU ) ठेवण्यात येत असते. आग लागल्यानंतर पालकांना यासंदर्भातील माहिती देण्यात आली, तेव्हा पालक आणि कुटुंबियांनी रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस
