Latest Marathi News

BREAKING NEWS

 

लोकसभेमध्ये महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर मांडणार भूमिका: सोनिया गांधी

0 158


काँग्रेसचं म्हणणं आहे की हे विधेयक आम्हीच आणलं आहे आणि आत्ता जे मोदी सरकार करु पाहतं आहे तो एक जुमला आहे. आता संसदेच्या विशेष अधिवेशनात आज या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. या मुद्द्यावर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या लोकसभेत सविस्तर भूमिका मांडण्याची शक्यता आहे.

 


केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नव्या लोकसभेत हे पहिलं विधेयक सादर केले. या विधेयकाला नारी शक्ती वंदन अधिनियम असं नाव देण्यात आलं आहे. हा कायदा तयार झाल्यानंतर लोकसभेत महिलांची संख्या १८१ होणार आहे असंही मेघवाल यांनी जाहीर केले. या विधेयकावर आज आणि उद्या म्हणजेच २० आणि २१ सप्टेंबर या दोन दिवशी चर्चा होणार आहे.


लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर चर्चा झाली तर त्या चर्चेत सोनिया गांधी या काँग्रेसतर्फे भूमिका मांडू शकतात. मंगळवारी याबाबत जेव्हा सोनिया गांधींना प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा हे विधेयक आमचेच आहे असं सोनिया गांधी म्हणाल्या होत्या. तसंच काँग्रेसचे राज्यसभेतले विरोधी पक्षनेते यांनीही मोदी सरकारने हे आमचेच विधेयक आणल्याचं म्हटलं आहे. कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनीही या विधेयकावरुन मोदी सरकारवर टीका केली.
विचारला. या सगळ्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.