माणदेश एक्सप्रेस न्युज
गोपीचंद पडळकर काय म्हणाले?
“धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे,” असे गोपीचंद पडळकर म्हणाले होते. यावर आता वेगवेगळ्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अशाप्रकराची विधानं करणं चुकीची आहेत : देवेंद्र फडणवीस
गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत देवेंद्र फडणवीसांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले, “गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशाप्रकराची विधानं करणं चुकीची आहेत. तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. याप्रकारच्या भाषेचा वापर करू नये, असं माझं स्पष्ट मत आहे.
विजय वडेट्टीवार
पडळकरांसारखी चिल्लर व्यक्ती अजित पवार यांना लांडगा म्हणत असेल, तर ते काय आहेत, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे.अशा लोकांना चिरडण्याची भूमिका ते घेतील.तेव्हा अजित पवार वाघ, सिंह आणि हत्ती आहेत, हे दाखवून देतील.
आम. अमोल मिटकरी
अमोल मिटकरी म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या मंगळसुत्र चोराविरुद्ध अकोल्यात मदनलाल धिंग्रा चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याला (गोपीचंद पडळकर) तत्काळ आवर घालावी, नाहीतर आम्ही सत्तेत आहोत हे विसरून जाऊ.
खास. सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “अजित पवार भाजपाबरोबर सत्तेत आहेत. सत्तेत असताना अजित पवार यांचा मित्रपक्ष त्यांच्याबद्दल अशी वक्तव्य करतो, हे अतिशय वाईट आहे. भाजपानं मोठ्या मनानं अजित पवारांना सत्तेत बरोबर घेतलं. पण, अजित पवारांचा अपमान करण्यासाठी बरोबर घेतलं का? याचं उत्तर भाजपानं दिलं पाहिजे. मित्रपक्षाबद्दल बोलण्याची ही कुठली पद्धत आहे. हे दुर्दैवी आहे. हा अजित पवारांचा अपमान आहे, अशी खंतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.