आटपाडीत बाजार समितीत डाळिंबाचे भाव वाढल्याने शेतकरी समाधानी ; अकलूज येथील शेतकऱ्याच्या डाळिंबाला मिळाला उचांक्की दर
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये पंढरीनाथ नागणे यांच्या मंगलमूर्ती उद्योग समुहाच्या मंगलमूर्ती फ्रुट सप्लायर्स मध्ये आज दिनांक १९ रोजी गिरझणी अकलूज चे संजय लोंढे या शेतकऱ्याच्या डाळिंबाला 101, 141, 191, 425 असा दर मिळाल्याने आटपाडीत बाजार समितीत सध्या तरी डाळिंबाचे भाव गगनाला भिडला आहे.
पिसेवाडी (वेळापूर) येथील शेतकरी अमोल पिसे यांच्या डाळिंबाला 89, 111, 135, 351 असा दर मिळाला असून, बावडा (इंदापूर) येथील पांडुरंग घोगरे यांच्या मालाला 82, 111, 141, 275 दर, माळशिरस येथील शेतकरी अमोल चौरे यांच्या डाळिंबाला 85, 111, 145, 225 असा तर माळशिरस येथील पराग रनवरे यांच्या डाळिंबाला 80, 110, 141, 211 असा दर मिळाल आहे. सणामुळे दरामध्ये वाढ झालेली आहे.
सध्या मालाची आवकही वाढलेली आहे. इतर पिकांपेक्षा डाळिंब पिकात उत्पन्न जास्त असल्याने विविध अडचणीवर मात करून शेतकरी डाळिंब लागवडीत पुन्हा जोमाने उभा राहिला आहे. व मोठ्या प्रमाणात बाहेरील भागातून डाळिंब आवक मध्ये वाढ झालेली आहे. त्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंगलमूर्ती उद्योग समूहाचे पंढरीनाथ नागणे यांनी सांगितले, शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना बागेतच माल देण्यापेक्षा मार्केट मध्ये माल आणून चांगला भाव मिळवून घ्यावा असे आवाहन मंगलमूर्ती उद्योग समूहाचे चेअरमन पंढरीनाथ नागणे यांनी केले आहे.