आटपाडी : आटपाडी तालुक्यातील खानजोडवाडी येथे शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
खानजोडवाडी येथील जय शिवराय गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त सदरचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास’ या विषयावर श्रीमंत कोकाटे हे व्याख्यान देणार आहेत. सदरचे व्याख्यान हे दिनांक २२ रोजी सायंकाळी ८.०० वा. खानजोडवाडी येथील भैरवनाथ मंदिराच्या पटांगणात संपन्न होणार आहे.
तरी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास’ जाणून घेण्यासाठी नागरिकांनी या व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन खानजोडवाडी येथील जय शिवराय गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.