Latest Marathi News

BREAKING NEWS

 

सभासदांचा हक्काचा गल्ला, त्यावर सत्ताधाऱ्यांचा डल्ला ! माजी चेअरमन यु. टी. जाधव यांची सत्ताधाऱ्यांवर टीका

0 655

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत पुरोगामी सेवा मंडळाची सत्ता जाऊन नव्या कारभाऱ्यांची सत्ता आली. सत्तेमध्ये येताना या बहाद्दरांनी नोकर भरती करणार नाही? , बक्षीस बोनस पगार देणार नाही? अवास्तव खर्च करणार नाही? एक अंकी व्याजदर आणि दोन अंकी डिव्हीडंट? अशा वल्गना केल्या खऱ्या ,पण सत्ताधाऱ्यांनी यातील एका वर्षात सगळ्यांनाच हरताळ फासत सर्व सभासदांची घोर निराशा केली असल्याची टीका माजी चेअरमन यु.टी. जाधव यांनी केली आहे.

 


पुढे बोलताना ते म्हणाले, सत्ताधारी एक वर्षाच्या कारभारावर आम्ही सभासदाभिमुख कारभार केला म्हणून मोठमोठ्याने बडवून घेत आहेत. त्यांनी गेले वर्षभर गाजत असलेल्या इमारत निधी या एकाच विषयावर ठासून बोलावे. आणि निसंकोचपणे सभासदांना हक्काच्या नफ्यातील रकमेवर गदा आणली की नाही? ते जाहीर करावे.


पुढे बोलताना ते म्हणाले, सन २०१–१६, चेअरमन उत्तम जाधव इमारत निधी ६,६२,९४९ रुपये सन २०१६-१७ चेअरमन शिवाजी पवार इमारत निधी १,४३,४९७ रुपये सन२०१७-१८ चेअरमन रमेश पाटील, इमारत निधी ८५,५६९ रुपये, सन२०१८-१९ चेअरमन हरीभाऊ गावडे 👉इमारत निधी २७,१४४ रुपये, सन२०१९-२०, चेअरमन सुनिल गुरव इमारत निधी ३,२४,८१६ रुपये, सन २०२०-२१, चेअरमन उत्तम जाधव 👉इमारत निधी २,२४,६९७ रुपये अशी एकूण १४,६८,६७२ रुपयेसभासदांच्या नफ्यातील किमान तरतुदी झालेल्या असताना,गतवर्षी जुन्या संचालक मंडळाच्या कारभारातील नफ्यातून नव्या कारभाऱ्यांनी तब्बल १,७०,००,००० (एक कोटी सत्तर लाख) इमारत निधी कडे वळवून आणखी साडेतीन टक्के लाभांशापासून वंचित ठेवले.


यावर्षीच्या नफ्यातून तब्बल १,५४,००,००० रुपये तरतुदीसाठी प्रस्तावित केले आहे. म्हणजे सभासदांचे हक्काचे ३,२४,००,००० (तीन कोटी 24 लाख) इमारत फंडासाठी वर्ग करण्याचा पराक्रम केला. सभासदांच्या हक्काच्या गल्ल्यावर सत्ताधारी डल्ला मारू पाहत आहेत. त्यामुळे त्यांना दिसेल तिथे जाब विचारूया ! आणि जणू काही स्वतःचे घर बांधताना स्वतःचे पैसे वापरत असल्याच्या अविर्भावात वागणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा अट्टहास मोडून काढूया.


केवळ हलगीनाद आंदोलनाने सभासदांमध्ये जागृतीचा प्रयत्न झाला आहे. यांनी सभासद भावनांचा आदर केला नाही तर यापुढे टप्प्याटप्प्याने बँकेच्या प्रत्येक शाखांपुढे बोंबाबोंब आंदोलन आणि संचालक घरात सभासद दारात अशी अभिनव आंदोलने करून यांच्या चुकीच्या कारभारावर आसूड ओढण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन शिक्षक बँक बचाव कृती समिती सांगली निमंत्रक सदस्य व माजी चेअरमन यु.टी. जाधव यांनी केले असून, वार्षिक सभेत अवास्तव इमारत निधी तरतूद रद्द करून सभासदांना त्यांच्या हक्काच्या लाभांशापासून वंचित ठेवू नये असे आवाहन देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.