Latest Marathi News

BREAKING NEWS

 

धक्कादायक : रात्रीच्यावेळी भररस्त्यात भाजपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या

0 550

नवी दिल्ली : बिहारमधील या धक्कादायक घटनेने अनेकांचे लक्ष वेधले. बिहारमधील सिवानमध्ये भाजपा नेत्याच्या हत्येने स्थानिक राजकारण तापल्याचे दिसते. रात्री कार्यालयातून घरी परतत असताना भाजपा नेत्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा एक नातेवाईकही जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 


माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भाजपाचे प्रभाग अध्यक्ष शिवाजी तिवारी हे कार्यालयातून घरी परतत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मेहुणा देखील दुचाकीवर बसला होता. अशातच भररस्त्यात दुचाकीवरून काही हल्लेखोर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. एक गोळी मृत नेत्याच्या मेहुण्याला लागली असून तो गंभीर जखमी आहे.


दरम्यान, हत्येच्या या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. सिवानचे पोलीस अधिखारी फिरोज आलम आणि निरीक्षक सुदर्शन रामही घटनास्थळी पोहोचले.

आपल्या सहकाऱ्याच्या हत्येनंतर स्थानिक भाजपा नेत्यांनी शोक व्यक्त केला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय पांडे यांनी शिवाजी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. “शिवाजी हे भाजपाचे अत्यंत सक्रिय कार्यकर्ते होते”, अशा प्रतिक्रिया भाजपा नेते देत आहेत. या हत्याकांडानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. अज्ञात मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांना पकडण्यासाठी पोलीस शहरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.