सोशल मीडियावर गणपतीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही लोकं घरीच गणपती हाताने साकारत आहे. घरी हाताने बनविलेल्या अशाच एका गणपतीबरोबर एक चिमुकली गोड संवाद साधतानाचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओत चिमुकली बाप्पाबरोबर मनमोकळेपणाने बोलताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ही चिमुकली बाप्पाच्या मुर्तीसमोर बसलेली आहे. गणपती बाप्पाची मुर्ती घरीच हाताने साकारलेली दिसत आहे. मुर्तीचे रंगकामसुद्धा अर्धवट बाकी आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चिमुकली गणपती बाप्पाच्या मुर्तीकडे बघून विचारते, “”तुला लाडू आवडतो?
” पुढे ही चिमुकली गणपतीला बोलण्याचा आग्रह करताना म्हणते, “गुरू ब्रम्हा बोल.. गुरू ब्रम्हा बोल आधी”
व्हिडीओ तुम्हाला दिसेल की पुढे ती मुर्तीच्या पाया पडते आणि बाप्पाला बरंच काही मागते. ती म्हणते, “बाप्पा सुखी ठेव, बुद्धी दे…मोठ्ठ कर..” चिमुकलीचा हा गोंडस व्हिडीओ पाहून कोणीही भारावून जाईन.