Latest Marathi News

BREAKING NEWS

 

बापरे! खास बाप्पाच्या उस्त्वासाठी केली २ कोटी नोटांनी सजावट; व्हिडीओ पहा…

0 532


बाप्पाच्या आगमनाचा उत्साह आणि जल्लोष आज सर्वत्र दिसून येत आहे. सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. बाप्पाच्या सजावटीत सगळ्यात महत्वाचा असतो तो मखर. बाप्पाचा मखर अगदी क्रिएटिव्ह असावा असा प्रत्येकाचाच अट्टाहास असतो. मार्केटमध्ये तुम्हाला बरेच थर्माकॉलचे मखर दिसतील. मात्र कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील एका गणपती मंदिरात बाप्पाला चक्क नोटांच्या मखरामध्ये बसवलं आहे.

 


या गणपती मंदिराला तब्बल २ कोटी रुपयांच्या चलनी नोटा आणि नाण्यांनी सजवण्यात आले. बंगळुरुच्या पुत्तेनहल्ली परिसरातील श्री सत्य गणपती मंदिरात ही सजावट करण्यात आली.


बाप्पाचं मखर सजवण्यासाठी २ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नोटा आणि ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नाण्यांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये १०, २०, ५०, १००, २००, ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा वापरण्यात आल्या.
यामुळे मंदिराला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय २२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरही २४ तास भाविकांवर राहणार आहे. सुमारे १५० स्वयंसेवक आणि कर्मचाऱ्यांनी सजावटीसाठी काम केले आहे. अतिशय आकर्षक अशी ही बाप्पाची सजावट दिसत आहे. हीच सजावट पाहण्यासाठी, बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.