Latest Marathi News

BREAKING NEWS

 

भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने खुन

0 361


भिवंडी : भिवंडी कल्याण सीमेवर असलेल्या कोनगाव गावातील शामबाग येथे असलेल्या येथे एका इमारतीच्या तळमजल्यावर भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या महिलेची हत्या झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री समोर आली आहे.
रात्री खोलीतून दुर्गंध येत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी कोनगाव पोलोसांना याबाबत माहिती दिली.

 

त्यांनतर पोलीस घटनास्थळी दाखल होत खोलीचा दरवाजा उघडला असता आतमध्ये एका ३० ते ३५ वर्षीय महिलेची धारधार हत्याराने हत्या केल्याचे समोर आले. घटनास्थळावरून पोलिसांनी एक पेपर कटर जप्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे.


या खोलीत ही महिला एकटीच राहत होती मात्र कधी कधी तिच्या सोबत आणखी एक महिला किंवा कधी कधी एक पुरुषही राहत असल्याची माहिती येथील स्थानिक नागरिकांकडून मिळाली आहे. या हत्येचे नेमकी कारण अजून समजू शकले नाही. घटनास्थळी कोनगाव पोलिसांसह ,गुन्हे शाखा पथक,फॉरेन्सिक पथक व पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे दाखल झाले असून पोलीस आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास कोनगाव पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.