Latest Marathi News

BREAKING NEWS

 

धक्कादायक : घरी कोणी नसल्याने २ वर्षाच्या चिमुकल्यानं इंजेक्शनच्या तब्बल गिळल्या ८ सुया; अखेर चिमुकल्याचा जीव…

0 603


लहान मुलांना नव्या वस्तू हातात घेऊन पाहण्याची, चव घेण्याची, तोंडात किंवा नाकात घालण्याची सवय असते. मोठ्या माणसांचे लक्ष नसताना मुले क्षणार्धात काहीतरी उद्योग करून ठेवतात आणि पालकांच्या चिंतेत भर पडते. एक अशीच भयानक घटना २ वर्षांच्या मुलासोबत घडली आहे. आई शेतात गेली असताना, अजाणतेपणी एका मुलाने इंजेक्शनच्या ८ सुया गिळल्या आहेत.

 


पूरू या देशातील उत्तरपूर्व परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. मुलगा खेळत असतानाच त्याने मेडिकलसाठी वापरात येणाऱ्या इंजेक्शनच्या ८ सूया गिळल्या आहेत. मुलाच्या आईचे लक्ष नसतानाच ही घटना घडली आहे. दोन वर्षांच्या चिमुकल्यासोबत घडलेली ही घटना ऐकून डॉक्टरही चकित झाले. त्यांनी ताबोडतोब मुलावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले.

या घटनेविषयी डॉक्टर इरफान सालजार यांनी म्हटलं आहे की, आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पोटावर चीरा मारल्यानंतर आतमध्ये लोखंडासारखी काही वस्तू दिसत होती. जेव्हा डॉक्टरांनी ते बाहेर काढले तेव्हा सुई असल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी एक एक करुन तब्बल आठ सुया बाहेर काढल्या आहेत, यानंतर डॉक्टरही हादरले आहेत. अखेर डॉक्टरांच्या उपचारांमुळं चिमुकल्याचा जीव वाचला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.