Latest Marathi News

BREAKING NEWS

 

शिक्षकाने पाच दिवसापूर्वी नवीन कार घेतली, अन थेट विहिरीत…..

0 1,364


माणदेश एक्सप्रेस न्युज : सोलापूर : पाच दिवसांपूर्वी खरेदी केलेली नवीन टियागो मोटार शेतात झाडाखाली सावलीत लावण्यासाठी सुरू केली असता नियंत्रण सुटल्याने समोरील शेतामधील विहिरीत कोसळली. त्यात एका शिक्षकाचा पाण्यात बुडून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव शिवारात रविवारी दुपारी घडली. ईरण्णा बसप्पा जूजगार (वय ४१ वर्ष, रा.मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड सोलापूर) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये अध्यापन करीत होते.

 


ईरण्णा बसप्पा जूजगार यांनी पाच दिवसांपूर्वीच नवीन मोटार कार (एमएच १३ ईसी ६०६८) खरेदी केली होती. रविवारी सुट्टीच्या दिवशी ते डोणगाव शिवारातील भाटेवाडी येथे कुटुंबासोबत आले होते. सोलापूरहून भाटेवाडी शेतात सर्व कुटुंबीय गाडीतून आले. सर्व कुटुंबीय व कार चालक घरात गेले. तेव्हा ईरण्णा झुजगार हे चालकाच्या आसनावर बसले आणि ही मोटार झाडाखाली सावलीत लावण्यासाठी सुरू केली. परंतु वाहन चालविण्याचा फार अनुभव नसल्यामुळे नियंत्रण सुटल्याने मोटार क्षणार्धात सुसाट वेगात समोरील विहिरीमध्ये जाऊन कोसळली.


नातेवाईक चंद्रशेखर आमले यांनी इतरांच्या सहकार्याने ईरण्णा जुगदार यांना पाण्याबाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.